30.04.2026 : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन वेळी केलेले राज्यपालांचे भाषण
30.04.2026 : भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’तर्फे मुंबई येथे आयोजित ‘लेन्स अँड लेगसी : बॉलिवूड इन फोकस’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज गॅलरीच्या वास्तूमध्ये केले. यावेळी राज्यपालांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र व पार्श्वगायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहिली व प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालिका निधी चौधरी, विविध देशांचे मुंबईतील प्रतिनिधी तसेच कला, छायाचित्रकाला व चित्रपटसृष्टीतील निमंत्रित उपस्थित होते.