29.11.2025 : अभिनेते अनुपम खेर यांना राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित
29.11.2025 : शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपालांच्या डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सुरी, डीएव्हीच्या संचालिका डॉ. निशा पेशीन तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.