29.11.2020 : आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनतर्फे कोविड योध्द्यांचा सन्मान
29.11.2020: कोविड योध्दा म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कोविड योध्द्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी YANCHYA हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये परमार्थ सेवा समितीचे चेअरमन-उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी, महाराष्ट्र पोलीस दलाचे महानिरीक्षक व नावाजलेले गझलकर कैसर खालिद, डॉ. बी.एल.चित्लांगिया, चित्रपट अभिनेते दीपक तिजोरी, धर्मराज फाऊंडेशनचे निलेश चौधरी, ‘जीईओ-रोटी घर’चे चेअरमन मनीष आर. शाह, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय उपसरचिटणीस डॉ. राजेंद्र अग्रवाल, रमेश गोयंका इत्यादींचा समावेश होता. यावेळी आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल, कवी तथा अभिनेते शैलेश लोढा व फेडरेशनचे इतर सदस्य तसेच कोविड योद्धे उपस्थित होते.