29.10.2024: राज्यपालांनी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन येथे स्वागत केले
29.10.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन मुंबई येथे स्वागत केले. यावेळी संचेझ यांच्या पत्नी बेगोनिया गोमेझ तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते. राज्यपालांनी पंतप्रधान पेद्रो संचेझ व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.