29.08.2020: ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग राज्यपालांच्या हस्ते सन्मानित
29.08.2020: जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या. नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. योगेंद्र नारायण, महासचिव आर के भटनागर, भारतीय जल संसाधन सोसायटीचे अध्यक्ष एस. के. कुमार, भारतीय लोक प्रशासन संस्थेच्ये अध्यक्ष एस.एम. त्रिपाठी यांसह जल व्यवस्थापन – संवर्धन क्षेत्रातील अनेक तज्ञ – निमंत्रित उपस्थित होते.