29.04.2025: राज्यपालांच्या हस्ते वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ

29.04.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली. हे नेत्र रुग्णालय आता ‘अगरवाल नेत्र रुग्णालय’ नेटवर्कचा भाग झाले आहे. उदघाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवाल, आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.