29.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चा पहिला दीक्षांत समारोह संपन्न

29.03.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूरचा पहिला दीक्षांत समारोह मिहान परिसरात संपन्न झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार डॅा. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दीक्षांत समारोहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. दीक्षांत समारंभात २०१८ च्या तुकडीची विद्यार्थीनी डॉ. जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यासोबतच १२१ एमबीबीएस पदवीधारकांना आणि २४ पदव्युत्तर पदवीधारकांना पदवीप्रदान करण्यात आली.