29.01.2024 : राज्यपालांनी ऐकली शालेय विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’
29.01.2024 : राज्यपाल रमेश बैस विविध शाळांमधील शिक्षक, पालक व शालेय विद्यार्थ्यांसह राजभवन येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम ऐकला तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. यावेळी अंजुमन इस्लाम संस्थेच्या सैफ तैयबजी गर्ल्स स्कूल, गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल व जी डी सोमाणी स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभाग व बृहन्मुंबई महानगर पालिका यांचे सहकार्य लाभले.