29.01.2024 : राज्यपालांची ‘इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेब्रन्स डे’ला उपस्थिती

29.01.2024 : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मारल्या गेलेल्या लाखो ज्यू धर्मीय लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेब्रन्स डे’ निमित्त मुंबईतील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ असलेल्या केनिसेथ इलियाहु सिनेगॉग येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा संपन्न झाली. यावेळी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फैबिग, इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, विविध देशांचे वाणिज्यदूत, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष व ज्यू समाजाचे नेते सॉलोमन सोफर तसेच ज्यू समाज बांधव उपस्थित होते.