28.10.2025: राज्यपालांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला
28.10.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यापीठांना नवे शैक्षणिक धोरण पूर्ण प्रामाणिकपणे राबविण्याची, विद्यापीठांचे गुणांकन सुधारण्याची तसेच राजभवनाला दर तीन महिन्यांनी आपला अहवाल पाठविण्याची सूचना केली. यावेळी विद्यापीठांचे कुलगुरु, संबंधित विभागांचे सचिव, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती प्रामुख्याने उपस्थित होते.