28.08.2023 : राज्यपालांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान

28.08.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सीबीआयचे माजी संचालक पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन व हृषिकेश येथील स्वामी राम साधक ग्रामचे प्रमुख, स्वामी रित्वन भारती यांना लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने ‘स्वामी कुवल्यानंद योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ.आर.एस.भोगल, सह कार्यवाह रवी दिक्षीत आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी कैवल्यधाम योग संस्था परिसरास भेट दिली आणि तेथील ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.