28.08.2021: भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारीचे प्रकाशन संपन्न
28.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यसभा व लोकसभा येथे सदस्य असताना दिलेली भाषणे तसेच संसदीय याचिका समितीचे अध्यक्ष या नात्याने दिलेल्या निर्णयांवर आधारित ‘भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज नवी दिल्ली येथे संपन्न झाले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, प्रकाशक संस्था ‘चाणक्य वार्ता’चे संपादक डॉ अमित जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.