28.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील शैक्षणिक परिषदेचे उदघाटन

28.03.2022 : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: प्रभावी अंमलबजावणीमध्ये खासगी क्षेत्राची भूमिका’ या विषयावरील एक दिवसीय शैक्षणिक परिषदेचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झाले. परिषदेचे आयोजन एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया (ईपीएसआय) या संस्थेने केले होते. यावेळी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्रबुद्धे, ईपीएसआयचे अध्यक्ष तसेच वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक कुलपती डॉ जी विश्वनाथन, ईपीएसआयचे उपाध्यक्ष डॉ मंगेश कराड, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ एच. चतुर्वेदी, डॉ एम आर जयराम,श्रीमती ए मलारविळी व कार्यकारी सचिव पी.पलानिवेल प्रामुख्याने उपस्थित होते.