27.11.2024: राज्यपालांनी ‘पर्यावरणासाठी जीवनशैली: शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे केले उदघाटन

27.11.2024: ‘पर्यावरणासाठी जीवनशैली: शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथील सभागृहात संपन्न झाले. चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज या संस्थेने ‘कोटक स्कुल ऑफ सस्टेनेबिलिटी’, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वरंगल, आदी संस्थेच्या सहकार्याने केले. उदघाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत, गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.