27.11.2023: श्रीमद राजचंद्र स्मारकाचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/ZsRCGqo2U5o/mqdefault.jpg)
27.11.2023: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्र यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्नी रोड स्टेशनजवळ निर्माण करण्यात आलेल्या श्रीमद राजचंद्र स्मारकाचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑपेरा हाऊसच्या मागच्या मॅथ्यूज रोडचे नामकरण करुन ‘श्रीमद राजचंद्र मार्ग’ असे करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेशजी, श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यक्ष अभय जेसानी, उपाध्यक्ष आत्मप्रीत नेमी व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी रॉयल ऑपेरा हाऊस येथे आयोजित ‘आत्मकल्याण दिवस’ कार्यक्रमात उपराष्ट्रपतींना गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते ‘जनकल्याण हितेशी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.