27.10.2020 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
27.10.2020 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांना दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली, तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.