27.09.2021: सिंधी हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने युवकांना राज्यपालांच्या हस्ते स्वयंरोजगार कीट’चे वाटप
27.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या वतीने गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ कीट राजभवन येथे देण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, सिंधी हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नारायण बबलानी, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाज, महिला अध्यक्षा दिव्या बजाज आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार, गणपत गायकवाड, डॉ गुरुमुख जगवाणी, थंडाराम तोलानी, रमेश बजाज, दयाल हरजानी, अनिला सुंदर, काजल चंदिरामाणी, अजीत मन्याल, डॉ. मनीष मिराणी, मुरली अदनानी, राजू खेतवानी, दिनेश तहलियानी, जीतू जगवानी, प्रेम भारतीय व उल्हासनगरच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.