27.09.2020: “आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे”: राज्यपाल
27.09.2020: पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदीक ‘किमो रिकव्हरी किट’चे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथून लोकार्पण कराण्यात आले. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, विवेकानंद रुग्णालय लातूरचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे, कर्करोग विभागाचे डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ.विनीता देशमुख, डॉ. शुभा चिपळूणकर आदि ऑन लाइन उपस्थित होते . यावेळी उद्योगपती रतन टाटा यांनी व्हिडिओ संदेशातून संस्थेला शुभेच्छा दिल्या.