27.08.2025: गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली. यावेळी राज्यपालांचे कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.