27.06.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभ सपंन्न

27.06.2025: सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या लव्हाळे, पुणे येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. एम एस शेजुळ, विद्यार्थी प्रतिनिधी हेन्री तेबांडेक आदी उपस्थित होते.