27.02.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न

27.02.2025 : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी अभिवाचन, काव्यवाचन व गायनाचा ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम राजभवन मुंबई येथे संपन्न झाला. पुणे येथील ‘कलागंण’ या संस्थेच्या वतीने ‘माय लेकरं’ हा आई आणि मूल यांच्या नात्याचा गोफ उलगडणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ अरुणा ढेरे यांची संकल्पना व संहिता असलेल्या या कार्यक्रमात डॉ गिरीश ओक व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अभिवाचन केले तर काव्यवाचन व गायन ‘कलांगण’च्या संचालिका चैत्राली अभ्यंकर यांनी केले. सुत्रसंचालन अमित दाते यांनी केले. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती तसेच कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.