27.02.2025: राज्यपालांची सहा विभागीय आयुक्त तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

27.02.2025:राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राज्यातील सहा विभागीय आयुक्तांची तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन वनहक्क कायदा, २००६ च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रत्येक पेसा जिल्ह्यांमध्ये आदर्श आदिवासी गाव तयार करणे, समयबद्द पद्धतीने वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळांशी संपर्क वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे, आदिवासी समाजातील विशिष्ट आरोग्य समस्या या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला आदिवासी विभागाचे सचिव डॉ विजय वाघमारे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव मच्छिन्द्र शेळके, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी (कोकण), चंद्रकांत पुलकुंडवार (पुणे), डॉ प्रवीण गेडाम (नाशिक), दिलीप गावडे (छत्रपती संभाजीनगर), श्वेता सिंघल (अमरावती) व डॉ माधवी खोडे चावरे (नागपूर) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.