26.11.2023: : राज्यपालांच्या हस्ते पनवेल येथील सील आश्रमास मदर तेरेसा स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान
26.11.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पनवेल येथील सील आश्रम या अनाथ, बेघर आणि परित्यक्त मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला मदर तेरेसा स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. हार्मनी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी हार्मनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ अब्राहम मथाई, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, दिग्दर्शक महेश भट्ट, पूजा भट्ट व इतर निमंत्रित उपस्थित होते.