26.09.2021 : राजभवन येथे भारत जैन महामंडळातर्फे विश्वमैत्री दिवस व क्षमापना समारोहाचे आयोजन

26.09.2021 : राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे विश्वमैत्री दिवस व क्षमापन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रुणवाल समूहाचे अध्यक्ष सुभाष रुणवाल, मोतीलाल ओसवाल समूहाचे मोतीलाल ओसवाल, नाहर समूहाचे सुखराज नाहर व रिधी सिध्दी ग्रुपचे प्रमुख पृथ्वीराज कोठारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भारत जैन महामंडळाच्या ‘स्वानुभूती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.