26.09.2021 : राज्यपालांच्या हस्ते सिंधु नदी पाणीवाटप समस्येवरील दोन पुस्तकांचे प्रकाशन

26.09.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘इंडस वाटर्स स्टोरी’ या अशोक मोटवानी व संत कुमार शर्मा लिखित पुस्तकाचे तसेच उत्तम सिन्हा लिखित ‘इंडस बेसिन अनइंटरप्टेड’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला लेखक अशोक मोटवानी यांचेसह अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील अधिकारी स्कॉट टिकनॉर, रा.स्व. संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ सतीश मोढ, ऑर्गनायझरचे माजी संपादक डॉ शेषाद्री चारी, मुंबई स्टोक एक्सचेंजचे मुख्याधिकारी डॉ आशिष चौहान, अनुप जलोटा, डॉ राधाकृष्ण पिल्लई, बाळ देसाई उपस्थित होते.