26.08.2021: राज्यपालांच्या हस्ते १३ वे न्यूजमेकर्स अचिवर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान
26.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २४ व्यक्तींना १३ वे न्यूजमेकर्स अचिवर्स पुरस्कार राजभवन येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे व अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.