26.04.2022 : राज्यपाल व विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत होलोकॉस्ट दिन प्रार्थनासभा संपन्न

26.04.2022 : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध ज्यू लोकांच्या स्मरणार्थ मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होलोकॉस्ट स्मृतिदिनानिमित्त एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले. ज्यू धर्मियांच्या काळाघोडा मुंबई येथील केनिसेथ इलियाहू सिनेगॉग या ऐतिहासिक ठिकाणी या प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांसह विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेणबत्ती लावली व त्यांना आपली आदरांजली वाहिली.