26.03.2022: राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान
26.03.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथील गोरक्षक सेवा ट्रस्टच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरक्षण सेवेसाठी देशाच्या विविध भागांमधील ४५ मान्यवरांना ‘गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी गौरक्षक सेवा ट्रस्टचे संस्थापक व गऊ भारत भारतीचे मुख्य संपादक संजय शर्मा ‘अमान’, फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष तरुण राठी व पटकथा लेखक विकास कपूर प्रामुख्याने उपस्थित होते.