26.02.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ
26.02.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वेस्टेशनांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांचे देखील उदघाटन अथवा बांधकामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रकला व निबंधलेखन स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव प्रामुख्याने उपस्थित होते.