26.01.2026: प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र लोकभवन येथे राष्ट्रध्वज वंदन
26.01.2026: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज लोकभवन, मुंबई येथे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना दिली. लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कार्यरत पोलीस अधिकारी व जवानांनी याप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत गायले. राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार हे यावेळी उपस्थित होते.