26.01.2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान
26.01.2026: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई येथील लोकभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना संबोधित केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा व मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यातील कृषी व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, भारतीय सैन्य दल, पोलीस सेवा तसेच विविध नागरी सेवांमधील वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते. उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, अभिनेते जॅकी श्रॉफ, गौरव मोरे, शिवाजी साटम, मधुर वेलणकर, प्रदीप वेलणकर कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित होते. यावेळी गायक जगत वर्मा यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.