26.01.2022 : राज्यपालांच्या हस्ते संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक विशेषांकाचे प्रकाशन
26.01.2022 : संस्कृती जागरण मंडळातर्फे प्रकाशित सांस्कृतिक वार्तापत्र या पाक्षिकाच्या ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराडे, सांस्कृतिक वार्तापत्राचे सचिव शिरीष पदे, वार्तापत्राच्या संपादिका सुनिता पेंढारकर, रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे, अजय मुडपे व इतर निमंत्रित उपस्थित होते.