26.01.2021: प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, वरिष्ठ शासकीय अधिकारी व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली व प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.