25.11.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस संपन्न
25.11.2023 : मुंबईचे सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कला, इतिहास व संस्कृती विषयातील विद्वतजनांना एशियाटिक सोसायटीची मानद फेलोशिप व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एशियाटिक सोसायटीच्या ९१ व्या अहवालाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरीया, उपाध्यक्षा शहरनाज नलवाला, मानद सचिव मंगला सरदेशपांडे, डॉ फरोख उदवाडिया आदी उपस्थित होते. डॉ शरयू दोशी (भारतीय कला, इतिहास व संस्कृती), डॉ अनुरा मानातुंगा (लेखक व क्युरेटर । कला इतिहास), प्रो. नोबुयोशी नामाबे (बुद्धिस्ट स्टडीज), प्रो गोपाल कृष्ण कान्हेरे (रौप्य पदक) व प्रो. ब्रजकिशोर स्वैन (धर्मशास्त्र – महामहोपाध्याय डॉ पां. वा. काणे सुवर्ण पदक) यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.