25.09.2024: राज्यपालांची मिरज, सांगली येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
25.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज शासकीय विश्रामगृह मिरज, सांगली येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, बार असोसिएशन सदस्य, डॉक्टर्स, व्यावसायिक तसेच कला, क्रीडा व संस्कृती क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व जिल्ह्य़ातील तसेच सर्वसाधारण विषयांवरील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकांना पालकमंत्री सुरेश खाडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानमंडळ सदस्य सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आदींनी आज राज्यपालांची भेट घेतली.