25.06.2025: सन १९७५ साली देशात लागू करण्यात आलेल्या सार्वत्रिक आणिबाणीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याचे निमीत्ताने राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

25.06.2025: सन १९७५ साली देशात लागू करण्यात आलेल्या सार्वत्रिक आणिबाणीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने आज राजभवन येथे संविधान हत्या दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह संविधान प्रेमी नागरिकांच्या रॅलीला झेंडा दाखवून राजभवन येथून रवाना केले.यावेळी आणिबाणी विरुद्ध लढणाऱ्या मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील ५ लोकशाही सेनानींचा राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांसह आणिबाणी सत्याग्रही तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.