25.04.2025 : मुंबई वायएमसीएच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

25.04.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वायएमसीए) च्या १५० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृह मुंबई येथे संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बॉम्बे वायएमसीएच्या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या भाषणातून त्यांनी बॉम्बे वायएमसीएच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमाना, वर्ल्ड अलायन्स ऑफ वायएमसीएच्या अध्यक्षा सोहेला हायक, आशिया व पॅसिफिक अलायन्स ऑफ वायएमसीएचे महासचिव नाम बू वॉन, नॅशनल कौन्सिल ऑफ वायएमसीए ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्हिन्सेंट जॉर्ज, राष्ट्रीय महासचिव एन. व्ही. एल्डो, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, १५० वा वर्धापन दिन समारोह समितीचे अध्यक्ष रुई रॉड्रिग्स, बॉम्बे वायएमसीएचे महासचिव अॅलन कोटियन, इंडिया फेलोशिप ऑफ वायएमसीए रिटायरीजचे अध्यक्ष स्टॅन्ले सी. करकाडा आणि बॉम्बे वायएमसीएचे सदस्य उपस्थित होते.