25.04.2025 : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या व्याख्यानमालेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यपालांचे भाषण

25.04.2025 : एकात्म मानवतावादाचे उद्गाते पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईत सन १९६५ साली दिलेल्या व्याख्यानमालेच्या हिरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी संबोधित केले. चर्चासत्राचे आयोजन दीनदयाल शोध संस्थान व लोढा फाउंडेशन यांनी केले होते. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत सुरेश सोनी, दीनदयाल शोध संस्थांचे सरचिटणीस अतुल जैन, विद्यापीठांचे कुलगुरु आणि इतर मान्यवर उपस्थित होते.