25.03.2022: राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद

25.03.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद साधला. यावेळी बिहारच्या नक्षलग्रस्त गया, जमुई, लखीसराय तसेच तेलंगणा राज्याच्या खम्मम येथील २१८ युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महासंचालक नितेश कुमार मिश्रा, नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र निदेशक प्रकाश कुमार मनुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.