25.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘ग्लोबल-स्पिन’ या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे उदघाटन
25.03.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ग्लोबल-स्पिन’ या वस्त्रोद्योग, हातमाग व तयार कपड्यांच्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे उदघाटन जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी पर्यावरण-पूरक हातमाग, पर्यावरण स्नेही वस्त्र व वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली. ‘ग्लोबलस्पिन’ व्यापार परिषदेचे आयोजन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने केले असून आयएमखादी फाउंडेशन तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई या संस्थांचे आयोजनाला सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राष्ट्रीय संस्थेच्या प्रमुख डॉ ग्लोरी स्वरुपा संचू, जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री, आयअँमखादी फाउंडेशनचे अध्यक्ष यश आर्य व राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक पवन गोडियावाला उपस्थित होते.