25.03.2022: आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान

25.03.2022: आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे एका विशेष दीक्षांत समारोहात मानद डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे मानद पदवी समारंभ पूर्वक देण्यात आली. यावेळी श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोदटिब्रेवाला व्यासपीठावर उपस्थित होते.