25.02.2022: राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान
25.02.2022: राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे ‘कामगार मित्र’ पुरस्कार राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले. यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, श्रीमती अनघा राणे व पुरस्कार विजेते निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कामगार मित्र विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.