24.12.2024: राज्यपालांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील कलाकारांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’
24.12.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संगीत क्षेत्रातील कलाकारांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. ‘स्पंदन आर्ट्स’ संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्व. मजरुह सुलतानपुरी यांना ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ (मरणोत्तर) तसेच पार्श्वगायक जावेद अली यांना २०२४ वर्षाचा ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्व. मजरुह सुलतानपुरी यांच्या वतीने त्यांचे पुत्र अंदलीब सुलतानपुरी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. प्रतिमा शेलार तसेच मोहम्मद रफी, मजरुह सुलतान पुरी व जावेद अली यांचे कुटुंबीय उपस्थित होते.