24.10.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मोदी’ज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन
24.10.2025 : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘मोदी’ज मिशन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन संपन्न झाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पुस्तकाचे लेखक, विधिज्ञ व पत्रकार बर्जीस देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा व जयकुमार रावल, अभिनेते दिग्दर्शक शेखर कपूर, उद्योजक व निमंत्रित उपस्थित होते. रूपा पब्लिकेशन द्वारे प्रकाशित या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.