24.10.2025: ‘नैसर्गिक शेती’ या विषयावरील चर्चासत्रात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे संबोधन
24.10.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज राजभवन येथे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ या विषयावरील चर्चासत्रात राज्यातील मंत्रिपरिषदेचे सदस्य व राज्य विधान मंडळाच्या सदस्यांना संबोधित केले. चर्चासत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मंत्री, राज्यमंत्री, राज्य विधान मंडळाचे सदस्य, मुख्य सचिव राजेश कुमार, विविध विभागांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी जैविक शेती व नैसर्गिक शेती यामधील फरक विशद केला व सर्व सदस्यांना नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी काम करण्याचे आवाहन केले.