24.09.2021: राज्यपालांच्या हस्ते मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, मिडिया क्षेत्रातील नेतृत्व पुरस्कार प्रदान

24.09.2021: इंटरनॅशनल ऍडव्हर्टायजिंग असोसिएशनच्या भारतीय शाखेच्या वतीने देण्यात येणारे मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग व मिडिया क्षेत्रातील १८ वे आयएए नेतृत्व पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला डिस्कव्हरी चॅनेलच्या मुख्याधिकारी मेघा टाटा, लोडस्टार युएम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी डायस, इंटरनॅशनल ऍडव्हर्टायजिंग असोसिएशनचे सहअध्यक्ष भास्कर घोष, एक्सप्रेस समूहाचे अनंत गोयंका प्रामुख्याने उपस्थित होते.