24.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस संपन्न
24.07.2026: आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या ‘कौटिल्य भवन’ बीकेसी मुंबई येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार, अभिनेते विकी कौशल, निमंत्रित आयकर दाते तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.