24.07.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आयकर विभागाचा१६६ वा स्थापना दिन सपंन्न

24.07.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयकर विभागातर्फे आयोजित १६६ वा स्थापना दिवस मुंबईतील कौटिल्य भवन येथे संपन्न झाला. सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते कौटिल्य (चाणक्य) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला आयकर अपिलीय प्राधिकरणाचे उपाध्यक्ष शक्तिजित डे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त मालती श्रीधरन, विविध मोठ्या आयकर दात्या कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, आयकर विभागातील अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते बड्या आयकर दात्या कंपन्या – स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा सन्स प्रा. लि., एचडीएफसी बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच सेवनिवृत्त अधिकारी आणि खेळाडू यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.