24.07.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत १६४ वा आयकर दिवस साजरा

24.07.2023: राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे १६४ वा आयकर दिवस साजरा करण्यात आला. मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचन्द्रन यांनी प्रास्ताविक केले तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँक ऑफ बडोदाचे मुख्याधिकारी देबदत्त चांद, आयकर आयुक्त विनय सिन्हा, अतिरिक्त आयुक्त सौरभ देशपांडे, व्यापार संघटनांचे प्रतिनिधी तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.