24.03.2026: राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे १५ युवा उद्योजकांना ‘इंडिया टुडे समूह व महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान
24.03.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज मुंबई येथे १५ युवा उद्योजकांना ‘इंडिया टुडे समूह व महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान केले. इंडिया टुडे समूह व महिंद्रा यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला इंडिया टुडेचे समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा, महिंद्रा ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य अधिकारी नलिनीकांत गोलगुंठा, युवा पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच निमंत्रित उपस्थित होते. युवा उद्यमी नव्या नवेली नंदा, गझल अलघ – वरुण अलघ, बोधिसत्व संघप्रिय, प्रणव वेम्प्टी, आवरेना जैन, सारः शाम, नारायण सुब्रमण्यम व नीरज राजमोहन, अग्नीश्वर जयप्रकाश, राधिका गुप्ता, माधव कृष्ण सतार वादक मेहताब अली नित्यजी, अभिनेत्री मोना सिंग व जेनेलिया देशमुख यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.